महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची मुलगी व खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती देताना सांगितले की, वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या ते डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत.

नेमके कारण काय? डॉक्टर काय म्हणाले?
दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर पवार यांच्या प्रकृती खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात निगराणी खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांना डिस्चार्ज मिळणार होता, मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांना अद्याप रुग्णालयातच राहावे लागत आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाला
“नियमित तपासणी आणि काही महत्त्वाच्या चाचण्यांसाठी शरद पवार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती मिळेल,”
प्रकृती स्थिर, पण खबरदारी
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची सध्याची प्रकृती स्थिर आहे पण त्यांचे वय आणि अलीकडील आरोग्य स्थिती पाहता डॉक्टरांनी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व चाचण्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच पुढील उपचार किंवा डिस्चार्ज बाबत निर्णय घेतला जाईल.
हे पण वाचा
गर्भपाताच्या गोळ्याच्या अति सेवनाने तरुणीचा मृत्यू… वाचा सविस्तर
बारामतीतील प्रचार सभेचा दौरा रद्द
रुग्णालयात असल्यामुळे शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे. बारामतीमध्ये होणारी प्रचार सभा पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. मात्र ते या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांवर या सभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व रिपोर्ट आल्यानंतरच शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देता येईल. दरम्यान, कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. शरद पवार यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून पुढील २४ तासांत निर्णय घेतला जाणार आहे.














