नाशिकच्या टीसीएसमध्ये २०२२ ते २०२६ दरम्यान महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार व धर्मांतराचे प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सात महिलांनी टीम लीडरवर विनयभंग, अश्लील शेरेबाजी व लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचे आरोप केले. एका तरुणाने जबरदस्तीने बीफ खाऊ घालणे व धर्मांतराचा दबाव आणल्याची तक्रार दिली. पोलिसांनी नऊ गुन्हे दाखल केले.
मुख्य सूत्रधार कोण?
एचआर मॅनेजर निदा खान (वय साधारण ३०) ही या प्रकरणाची मास्टरमाइंड आहे. ती मूळची नाशिकची असून २०१८ पासून टीसीएसमध्ये होती. ती गरजू मुलींना नोकरी देऊन त्यांची टीम लीडरशी ओळख करून द्यायची. पीडितांना जीन्सऐवजी पंजाबी ड्रेस घालण्यास भाग पाडले, हिंदू देवतांची अवहेलना केली.
हे सुद्धा वाचा
सामाजिक वादातून माजी सरपंचाची कार जाळली ?
गोरेगाव नेस्को ड्रग्स प्रकरण, दोन जनाचा मृत्यू, पार्टीला ऑरी उपस्थित
आरोपी कोण?
तौसीफ अत्तार, दानिश शेख, रजा मेहमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अंसारी, शफी शेख यांना अटक. निदा खान अद्याप फरार. एचआरच्या सहाय्यक महाव्यवस्थापक अश्विनी चैनानीलाही अटक करण्यात आली आहे.
HR ची भूमिका? 
पीडितांनी अश्विनी चैनानी यांना ७८ ईमेलद्वारे तक्रारी केल्या होत्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. उलट तक्रार करणाऱ्या महिलांवर कामाचा ताण वाढवला गेला.
निदा खान कशी निसटली?
दोन-अडीच महिन्यांपूर्वी तिने मुंबईत बदली करून घेतली. पोलिसांना शंका आहे की ती मुंबईतील गर्दीच्या वस्तीत लपली आहे. तिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाने कॉर्पोरेट जगतात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे.













