राजकीय मतभेदांना तडा देत विकासासाठी डॉ. सुजय विखे पाटलांची सरप्राईज डिनरभेट Dr.Sujay Vikhe
शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास मी तयार – डॉ. कल्याणी आरणे
शिर्डी (प्रतिनिधी)
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर उत्तरेतल्या स्थानिक राजकारणात एक मोठी सकारात्मक घडामॊड घडली आहे. काही महिन्यांपूर्वी राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात उभे असलेले राजकीय विरोधक राजकीय मतभेद विसरत जेवणाच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळाल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे निवडणुकीत विरोधात उभ्या राहिलेल्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह भोजनाचा आस्वाद घेत संवाद आणि सहकार्याचा नवा संदेश त्यांनी दिला. आरणे कुटुंबियांसह त्यांनी जमिनीवर बसून जेवतांना सामान्य कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात आणि राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. कल्याणी आरणे यांच्या प्रवासाचे कौतुक केले. (Dr.Sujay Vikhe)
समाजातील कष्टकरी घटकांमधून नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची ताकद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा अधिक मजबूत होत असल्याचा उल्लेखही यावेळी डॉ विखे यांनी केला. Shirdi
२४ ते २५ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाचा यल्लो अलर्ट
याशिवाय, राजकारण हे वैयक्तिक द्वेषासाठी नसून विकासासाठी असते, हे लक्षात घेत शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक राजकारण आवश्यक आहे हे डॉ. सुजय विखे यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात डॉ. आरणे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा उल्लेख केला होता, याचा संदर्भ देत समविचारी व्यक्तींना पुन्हा एकत्र आणणे ही संघटनात्मक जबाबदारी असल्याच डॉ.विखे म्हणाले.(Atal Bihari Bajpayee)
आपली भूमिका स्पष्ट करताना, दादांच्या अचानक घरी येण्याने आश्चर्य वाटले. मात्र, संस्कृतीनुसार पाहुण्याचे आदरातिथ्य करत दादांना जेवणाचा आग्रह केला. मोठ्या पदावर कार्यरत असूनही डॉ. विखे यांनी घरच्या साध्या जेवणाचा स्वीकार केल्याबद्दल डॉ. आरने तसेच कुटुंबीयांनी डॉ. विखे यांच्या साधेपणाचं विशेष कौतुक केलं.
या भेटीत केवळ औपचारिकता न राहता नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान समोर आलेले विकासाचे मुद्दे त्यांनी मांडले असून, ते मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. BJP
राजकीय भूमिकेबाबत बोलताना भारतीय जनता पक्ष हा विचारधारेवर चालणारा आणि संस्कृती जपणारा पक्ष असल्याचे डॉ. आरणे यांनी सांगितले. शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भाजप एकच आहे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी भविष्यातील सहकार्याचे संकेत दिले आहेत.













