मुंबई : पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अॅड. स्मिता चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली ‘जर्नालिस्ट असोसिएशन’च्या शिष्टमंडळाने आज आमदार अमिन पटेल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात संघटनेचे अन्य पदाधिकारीही सहभागी झाले होते.
अधिवेशनात पत्रकारांची बाजू मांडली होती
या बैठकीत आमदार पटेल यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात पत्रकारांचे मुद्दे कसे ठळकपणे मांडले, यावर विस्तृत चर्चा केली. दरम्यान, आमदारांनी अधिवेशनात पत्रकारांच्या अडचणी सरकारपुढे धडाडीने मांडताना, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची गरज अधोरेखित केली होती.
हे पण वाचा
पत्रकारांचे प्रश्न थांबता कामा नये – आमदार अमीन पटेल
पत्रकार संघटनेकडून सन्मान
या शुभेच्छा भेटीदरम्यान, ‘जर्नालिस्ट असोसिएशन’च्या वतीने आमदार अमिन पटेल यांचा शाल आणि फुलगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संघटनेने पत्रकारहितासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल आमदारांचे आभार मानले.
या बैठकीमुळे पत्रकारांमध्ये एक आशावाद निर्माण झाला आहे. आमदार पटेल यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठका घेऊन पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. यामुळे पत्रकारांच्या कामातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














