शिर्डी येथील समता पतसंस्थेतील बनावट खात्यांचा घोटाळा उघडकीस येत असून, आता या प्रकरणात आरोपी अशोक खरात यांच्या दोन मुलीची नवे येत आहेत, पोलिस तपासात असे स्पष्ट झाले आहे की, खरातच्या मुलींच्या नावावर समता पतसंस्थेत खाती आहेत, ज्यातून दोन कोटी पेक्षा जास्तिचे व्यवहार करण्यात आले आहेत.

खरातच्या मुलींची चार खाती, दोन कोटींहून अधिक व्यवहार
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या दोन मुलींच्या नावावर समता पतसंस्थेत एकूण चार खाती असल्याचे उघड झाले आहे. या खात्यांवरून आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्या वरचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस आता या सर्व व्यवहारांची खातरजमा करणार आहेत.
५७ खात्यांवर खरातच नॉमिनी
तपासात अजून एक गंभीर बाब समोर आली आहे. समता पतसंस्थेतील एकूण १०० खात्यांपैकी ५७ खात्यांवर अशोक खरात हाच नॉमिनी असून, या सर्व खात्यांशी त्याचाच मोबाईल क्रमांक जोडलेला आहे. सुमारे ४५ खातेदारांनी पोलिसांना स्पष्ट केले आहे की, त्यांचे समता पतसंस्थेतील खाते आणि आर्थिक व्यवहारांशी कोणताही संबंध नाही. हे सगळे खाते बनावट पद्धतीने उघडण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
या ४५ खात्यांतून एकूण सुमारे ५० कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व व्यवहार संशयास्पद असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
खरातच्या मुलींचे जबाब नोंदविणार
शिर्डी पोलिसांनी आता अशोक खरातच्या दोन मुलींचे जबाब नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, संबंधित खात्यांवरील स्वाक्षऱ्यांची पडताळणीही केली जाणार आहे. जर या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे सिद्ध झाले, तर या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढेल.
हे पण वाचा
शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…
ट्रम्प सरकारचे, १६६ अब्ज डॉलरचे टॅरिफ रिफंड सुरू
दीपक लोंडे आणि पत्नीची चौकशी
याप्रकरणी राजकीय नेत्यांच्या संपर्कातील दीपक लोंडे याची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीचाही जबाब पोलिसांनी नोंदविला. तिच्या नावावरही समता पतसंस्थेत खाते असल्याचे समोर आले आहे. मात्र, तिने या खात्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. दीपक लोंडे याच्या दोन खात्यांतून सुमारे एक कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे.













