अमरावतीमधील परतवाडा भागात घडलेल्या जघन्य लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणातील अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एसआयटीने तपासाला वेग दिला आहे. आता तपासादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुख्य आरोपीने एका तथाकथित ‘लव्ह गुरू’ची मदत घेतल्याचे उघड झाले आहे.
मुख्य आरोपी अयान अहमदने मुलींचे शोषण करण्यासाठी एक विशिष्ट रणनीती आखली होती. तपासात असे समोर आले आहे की, अयानला मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी ‘लव्ह गुरू’ नावाच्या व्यक्तीकडून टिप्स मिळत होत्या. या लव्ह गुरूने सांगितलेल्या पद्धतीने अयान मुलींशी संवाद साधायचा.

कशी होती मुलांशी चॅटिंगची पद्धत?
आरोपी अयान मुलींशी बोलण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरायचा. सुरुवातीला तो थेट प्रश्न विचारायचा – ‘हाय, हॅलो छोडो, आप वही हो ना जो वहां मिले थे?’ या प्रश्नाद्वारे तो समोरच्या मुलीला संभाषणात अडकवून घ्यायचा. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण करायचा. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्वनियोजित होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
भाड्याच्या फ्लॅटचा वारंवार वापर
तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आरोपी अयानने त्याचा मित्र मानव सुगंधे याच्या कथोरा रोडवरील भाड्याच्या फ्लॅटचा सात ते आठ वेळा वापर केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी फ्लॅट मालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, फ्लॅट मालकाला या कृत्यांची माहिती होती की नाही, याचा शोध सध्या सुरू आहे.
कॅफेमध्येही सुरू होते अश्लील प्रकार
एसआयटीच्या तपासात आणखी काही गंभीर खुलासे झाले आहेत. आरोपी अयान ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे शोषण करायचा, त्याच भागातील ‘द कॅफे रॉयल 10’ मध्येही तो मुलींना घेऊन जायचा.
हे पण वाचा
शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…
कॅफेमध्ये वेगळे कंपार्टमेंट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅफेमध्ये प्रत्येक जोडप्याला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट होते. या कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी आरोपी अयान कॅफे चालकाला चारशे रुपये द्यायचा. एवढेच नव्हे तर या कंपार्टमेंटमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळेही चालत असल्याचे उघड झाले आहे. अमरावतीसह अचलपूर, परतवाडा येथील कॅफेमध्येही अयान मुलींना घेऊन जायचा. सध्या पोलिसांकडून या कॅफे मालकांची चौकशी सुरू आहे.
वझ्झर डॅम गार्डनशी संबंध
या प्रकरणाची पाळेमुळे वझ्झर डॅम गार्डनपर्यंत पोहोचली आहेत. तिथेच आरोपी आणि पीडित तरुणींची भेट झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचून संबंधित माहिती गोळा केली होती.
41 सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट
या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलीग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. सायबर सेलच्या मदतीने आतापर्यंत 41 अकाउंट्स डिलीट करण्यात आली आहेत. एसआयटीने आतापर्यंत 10 पेक्षा अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपास यंत्रणा प्रत्येक मुद्द्याचा बारकाईने तपास करत असून संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.














