राज्यात हवामानाचा अचानक उलटफेर
राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्णतेचा कडाका होता. अनेक जिल्ह्यांत तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला होता. काही ठिकाणी तर 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले होते. मात्र, आता हवामानात अचानक मोठा बदल जाणवणार आहे.
दुहेरी संकटाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यावर दुहेरी संकट उभे राहिले आहे. एकीकडे उष्णतेचा तडाखा, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धोका.
हे पण वाचा
शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…
भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार सील! दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या ‘आत्मज्ञानी’वर पोलिसांची कारवाई
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस व गारपीट होऊ शकते. तसेच, कोकण व मराठवाड्यातील काही भागांनाही याचा फटका बसू शकतो. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागात गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हाताशी आलेली पिके वाया गेली होती. पुन्हा एकदा अशीच स्थिती निर्माण झाली आहे. सततच्या गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुण्यात सुरू झाला अवकाळी पाऊस
पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कांदलगाव, सरडेवाडी, शाहा हिंगणगाव, उजनी पट्ट्यात रात्री साडेआठ वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. तर, अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ या गावांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.
राज्यातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हवामान विभागाने वेळोवेळी अपडेट्स दिले आहेत. पावसामुळे वीज पडण्याचा धोकाही लक्षात घेता, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
















Comments 1