Naresh Rora , Parth pawar, Ajit pawar
जनता आवाज न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. त्यानंतर पक्षाचे विलीनीकरण आले तसेच पक्षासंदर्भात इतर निर्णय असतील याबाबत अनेक संभ्रम तयार झाले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी ३० जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेतही जागा रिक्त झाली असून त्या जागेवर उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न सर्वाना पडलेला असतानाच एक महतवाची बातमी समोर आली आहे.
T 20 world cup सुपर 8 मध्ये ‘या’ संघांशी होणार टीम इंडियाचा सामना, शेड्युलमध्ये पहिला सामना कोणाशी?
राज्यसभेची ही जागा रिक्त झाल्यानंतर साहजिकच पार्थ पवार या जागेवर जातील अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र अशातच दिवंगत उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी निवडणुकीसंदर्भात नियोजन करणारे डिझाइनबॉक्स (Designbox )या कंपनीचे सहसंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक नरेश अरोरा आज पुन्हा चर्चेत आले आहेत. मुळात आज सकाळपासूनच नरेश अरोरा यांना राज्यसभेच्या खुर्चीचे वेध लागले असल्याच्या बातम्या समोर येत होत्या, ज्यामुळं एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, याविषयीची एक बातमी छापून आली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता नरेश अरोरा यांच्या कार्यालयाकडून या बातमीवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
नरेश अरोरा यांना राज्यसभेवर जागा हवी आहे अशी चर्चा सोशल मीडिया ट्रोल्स तसेच स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या काही लोकांमध्ये दिसून येत आहे. मात्र या चर्चेत कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही तसेच असं स्पष्टीकरण अरोरा यांच्या कार्यालयातून देण्यात आलय. Ajit Pawar
Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; कुठे कसा परिणाम?
नरेश अरोरा यांनी याआधी अनेक राजकीय लोकांसाठी व्यावसायिक नात्याने काम केलेले आहे. निवडणूका, रणनीती , संघटना, समन्वय अशा क्षेत्रातील त्यांचं काम मोठं असल्यामुळे त्यांना विविध ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र, स्वतः राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. त्यांना विविध नेत्यांसाठी प्रामाणिक काम करायला अधिक समाधानकारक वाटते असं अरोरा यांच्या कार्यालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे म्हटलं आहे. NCP










