देशात विधानसभा निवडणुका होत आहेत. अनेक राजकीय पक्ष सभा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, या निवडणुका संपल्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. ज्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडणार आहे.
जगातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जगातील तेल बाजारावर संकट, कारण काय?
गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे जगातील तेल बाजारावर संकट आलं आहे.
विशेषतः होमुर्जच्या समुद्र धुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.
जगातील अनेक देशांत तेल संकट उभे राहिले आहे. काही देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. मात्र भारताने आता पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली नसली तरी निवडणुकीनंतर वाढ होण्याची शक्यता आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीचा अंदाज काय?
आपल्या देशातील brokerage firm कोटक Institutional Equity ने एका अहवालात एक अंदाज व्यक्त केला आहे.
अहवालानुसार, सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे petrol आणि diesel चे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पण एकोणतीस एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर petrol आणि diesel च्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.
त्यांनी स्पष्ट केले की, जर कच्च्या तेलाची किंमत प्रति barrel एकशे वीस डॉलरच्या घरात गेली, तर तेल कंपन्यांनी आपले नुकसान भरून काढण्यासाठी petrol आणि diesel च्या दरात पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंतची वाढ करणे गरजेचे आहे.
इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आपल्या देशावर काय?
इराण, अमेरिका आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे बाजारात कमालीची अस्वस्थता आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हे संघर्ष लवकर संपला नाही तर पुरवठा साखळीवर त्याचा मोठा परिणाम होईल. कच्च्या तेलाची जागतिक टंचाई निर्माण होईल आणि त्याचा फटका जगातील इतर देशांप्रमाणे भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येईल. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा ताण पडेल.
हे पण वाचा
कल्पना खरात यांचा अटक पूर्व जमीन राहता न्यायालयाने केला नामंजूर… वाचा सविस्तर….
लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार: १२,७५७ पुरुषांनी बनावट महिला बनून उडवले २२.९६ कोटी
ही दरवाढ कधी होऊ शकते?
२९ एप्रिलपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कायम राहण्याची शक्यता आहे.
पण त्या नंतरच्या प्रत्येक आठवड्यात तेल कंपन्या सुधारित दरवाढ करून इंधनाच्या किमती वाढवू शकतात. तसेच, वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीवर सुद्धा हे दर वाढले जाऊ शकतात.













