जनता आवाज डिजिटल : T20 World Cup 2026 Team India Super 8 Schedule: टी 20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) चांगलीच रंगात आल्याचं पाहायला मिळतंय. ग्रुप स्टेजचा थरार अनुभवल्यानंतर आता शनिवार पासून सुपर 8 फेरीतील सामन्यांचा रोमांच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अशातच ग्रुप ए मध्ये भारताने लागोपाठ तीन सामने जिंकले असून आता सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. महत्वाचं म्हणजॆ पाकिस्तान विरुद्ध भारत सामना चाहत्यांना विशेष भावला. T20 World Cup 2026 Team India Super 8 Schedule: टी 20 वर्ल्ड कप 2026
(Super 8 ) सुपर 8 साठी आता एकूण 5 संघ क्वालिफाय झालेले असून शनिवारपासून क्रिकेट चाहत्यांना उत्तम दर्जाचा खेळ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसी (ICC) कडून दोन ग्रुप बनवण्यात आले होते. यात भारताच्या विरुद्ध खेळणारे तेच संघ आहेत जे आता पुढे जाताना दिसत आहेत. दरम्यान, सुपर ८ मध्ये भारताच्या सामन्यांच शेड्युल हाती आलं आहे, ज्यात भारताचे सामने कोणकोणत्या टीम्स सोबत होऊ शकतात हे पाहू.
Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; कुठे कसा परिणाम?
सुपर ८ फेरीतील टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक कसे?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 22 फेब्रुवारी , अहमदाबाद – पहिला सामना India Vs South Africa
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया/जिम्बाब्वे – 26 फेब्रुवारी , चेन्नई – दुसरा सामना India Vs Australia
टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडीज – 1 मार्च, कोलकाता – तिसरा सामना India Vs West Indies
सुपर 8 च्या ग्रुप X मध्ये टीम इंडियाच स्थान :
कोलंबो येथे रविवारी अतिशय रोमांचक असा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला. ज्यात पाकिस्तानला तब्बल 61 धावांनी भारताने धूळ चारत ग्रुप स्टेजमधील तीनही सामने जिंकले. ज्यामुळे थेट सुपर 8 फेरीसाठी टीम इंडियाला क्वालिफाय केलं. सुपर 8 मधील 8 संघांना आता प्रत्येकी 4 अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय.
अहिल्यानगरच्या भिंगार परिसरात नागरी वस्तीत बिबट्याची दहशत पहा व्हिडिओ
ग्रुप X मध्ये टीम इंडियासोबत इतर कोणते उत्तम खेळ दाखवणारे संघ आहेत?
भारताशिवाय ग्रुप X मध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया किंवा झिम्बाब्वे हे संघ पाहायला मिळतील. यात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. आतापर्यंत ग्रुप ए मधील तीन संघ फायनल झालेत तर चौथा संघ निश्चित होणं बाकी आहे. ऑस्ट्रेलिया किंवा झिम्बाब्वे यातील एक संघ सुपर 8 मध्ये स्थान मिळवेल. T20 World Cup 2026 Team India Super 8 Schedule: टी 20 वर्ल्ड कप 2026











