Susolar eclipse 2026 नव्या वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दुपारी लागणार आहे. ज्योतिष तसेच विज्ञान शेत्रात याला विशेष महत्वाचं मानलं जात. नवीन वर्षाचं हे पहिलं-वहिलं सूर्यग्रहण नेमकं काय घेऊन येणार आहे ते पाहूया. एक विशेष खगोलीय घटना म्हणून विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पहिले जाते. तर ज्योतिष शास्त्रात नेतृत्वच प्रतीक मानल्या जाणाऱ्या सूर्याला ग्रहण लागणं ही विशेष बाब मानली जाते. यावेळी हे ग्रहण कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात लागतानाचे योग्य आहेत.
या सूर्यग्रहणाचं खास आकर्षण म्हणजे रिंग ऑफ फायर. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी ते मध्य स्थितीत असेल आणि 7 वाजून 57 मिनिटांनी संपेल. म्हणजे हे ग्रहण साधारण साडेचार तास चालणार आहे. रिंग ऑफ फायर Rings of fire मध्ये चंद्र सूर्याचा सुमारे 96 टक्के भाग झाकून टाकतो, ज्यामुळे सूर्याची फक्त बाहेरची कड चमकताना दिसते. हे रिंग ऑफ फायरच अद्भुत दृश्य सुमारे सव्वा दोन मिनिटं दिसेल. मात्र, भारतातील लोक या ग्रहणाला मुकणार आहेत. कारण सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे इथे नियम पाळण्याची काही गरज नाही. शास्त्रानुसार ग्रहण जिथे दिसतं, तिथेच त्याचे नियम लागू होतात. त्यामुळे आज आपली मंदिरं उघडी राहतील, खाण्यापिण्यावर कसलीही बंधनं नसतील आणि गर्भवती महिलांनीही अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, टांझानिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसेल. तिथे राहणाऱ्या भारतीयांनी मात्र स्थानिक वेळेनुसार नियम पाळायला हरकत नाही.











